Design a site like this with WordPress.com
Get started

Monthly Reports

January report

२६ डिसेंबर आणि २७ डिसेंबर या दिवशी करार झाल्या नंतर विज्ञान आश्रम मध्ये फोटोथोन चे नियोजन करण्यात आले. हे फोटोथोन ११ जानेवारी ला घेण्यात आला. या कार्यशाळेला पाबळच्या जवळपासच्या  मुलींनी सहभाग घेतला. तसचे आश्रम मध्ये इटली वरून आलेल्या महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत विज्ञान आश्रमातील ऊती संवर्धन प्रयोगशाळेचे फोटोथॉन घेण्यात आले.

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

विज्ञान आश्रम ऊती संवर्धन प्रयोगशाळा फोटोथॉन

Photothon at Vigyan Ashram Tissue Culture laboratory

१ जानेवारी या दिवशी पूजा जाधव हिने कार्यशाळा घेतली आहे. या कार्यशाळेत मराठी विकिपीडियाशी ओळख आणि खाते बनून लेखांमध्ये सुधारणा करणे याचा समावेश केला होता.  

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

विकिपीडिया:रेड एक्स विद्यार्थी कार्यशाळा, डी. आय.लॅब विज्ञान आश्रम,कोथरूड पुणे ,०१ जानेवारी २०२०

विज्ञान आश्रम हे विकिपीडिया वर काम करत आहे. परंतु त्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत नाही. हि गोष्ट टाळण्यासाठी आम्ही विकिपीडिया आणि कॉमन्स वर आश्रम नि केलेल्या कामाची मिळून एक वर्ग केला आहे.

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

 Vigyan Ashram

विकिपीडिया वर काम करणाऱ्या मुलींचा video केला आहे. या video मध्ये विज्ञान आश्रममध्ये विकिपीडियाचे काम कसे केले जाते. विकिपीडिया सह उपक्रम कोणते उपक्रम राबवले जातात आणि ते एकमेकांच्या कसे जोडलेले आहेत याबद्दल माहिती मिळते.

सावित्रीच्या ऑनलाइन लेकी

तसेच काही विषयावरती लेख तयार केले :

लोकमान्य टिळकांचे 2 खंड स्कॅन करून झाले आहेत त्यामध्ये दुरुस्ती चालू आहे. आणि 1 खंड तपासण्यासाठी दिला आहे . तसेच नरहर कुरूंदकर यांचे 13 पुस्तकांच स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.

समग्र लोकमान्य टिळकांचे ९६८ पाने आणि नरहर कुरूंदकर यांचे २५३६ एवढे होवून एकूण स्कॅन पाने ३५०४ झाले.

Ocr हे तपासून झालेले पुस्तक आणि सुबोध कुलकर्णी सर यांनी सांगितल्यावर ही प्रकिया केली जाते. यानुसार ल. ना. गोडबोले यांचे ३ पुस्तकांचे ocr केले त्याचे एकूण ३३१ पाने पूर्ण झाले.  

. ना. गोडबोले यांच्या पुस्तकांचे OCR:

February report

February report

५ फेब्रुवारी या दिवशी अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेचे ९ कार्यकर्त्यांनी विज्ञान आश्रम ला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी विकिपीडियाचे काम तसेच स्कॅनिंग याबद्दल माहिती  समजून घेतली.

     27 फेब्रुवारी या दिवशी कोमल संभुदास आणि हर्षदा राऊत यांनी मिळून राष्ट्रीय मराठी भाषा दिनानिमित्त आश्रममध्ये कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये त्यांनी मराठी  भाषा याबद्दल आश्रम मधील मुलांना मार्गदर्शन केले. तसेच इतर भाषांचा वापर न करता मराठी भाषेत नाटक सादर केले व कार्यक्रमाच्या शेवटी इतर भाषांबरोबरच मराठी भाषा आपल्यासाठी किती महत्वाची आहे ते समजून सांगितले. या कार्यक्रमत मराठी विकिपीडियाशी ओळख आणि कसे काम करतात याबद्दल माहिती दिली.

     २८ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान TTT 2020 या कार्यक्रमाचे आयोजन CIS-A2K यांनी केले. या कार्यक्रमासाठी विज्ञान आश्रमतर्फे प्रियांका जाधव हिने सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये wikivayage, Wikisource, wikidata, Copyright, Documentation  या संबधित मार्गदर्शन मिळाले.

     विज्ञान आश्रम मध्ये फोटोथोन चे नियोजन करण्यात आले. हे फोटोथोन २९ फेब्रुवारी ला घेण्यात आला. या कार्यशाळेला पाबळच्या जवळपासच्या  मुलीं व मुलांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत विज्ञान आश्रमातील फॅब लॅब प्रयोगशाळेचे फोटोथॉन घेण्यात आले.

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

विज्ञान आश्रम डिजीटल फॅब्रीकेशन लॅब(फॅब लॅब )फोटोथॉन

Photothon at Vigyan Ashram Fab Lab

तसेच काही विषयावरती लेख तयार केले :

लोकमान्य टिळकांचे 3 खंड स्कॅनिंग सुरु आहे. तसेच नरहर कुरूंदकर यांचे 13 पुस्तकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्यांची तपासणी सुरु आहे.

समग्र लोकमान्य टिळकांचे खंड आणि नरहर कुरूंदकर यांचे एकूण १५०० पाने स्कॅन करून झाले.

Ocr हे तपासून झालेले पुस्तक आणि सुबोध कुलकर्णी सर यांनी सांगितल्यावर ही प्रकिया केली जाते. यानुसार राजगुरुनगर ग्रंथालयाच्या पुस्तकांचे Ocr सुरु आहे.

राजगुरुनगर ग्रंथालयाचे १  पुस्तकांचे  OCR:

March Report

या महिन्यात विज्ञान आश्रम मध्ये आम्माच्या स्मुर्ती दिना निमित्त फोटोथॉन घेण्यात आले. त्यादिवशी आश्रमातील सर्व विध्यार्थी व स्टाफ यांनी मिळून आश्रमातील वेगवेगळ्या विभागांचे फोटो काढले आणि ते Wikimedia commons वर अपलोड केले.

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

   Women History Month Photothon at Vigyan Ashram, Pabal

तसेच या महिन्यात Wikipedia वर काही विषयावरती लेख तयार केले :

१ . एलईडी दिव्यांची माळ

२ . कोरोनाव्हायरस एचकेयू 15

३ . अन्न द्रव्ये

४ . एलईडी दिवा

५ . हायड्रोक्सीक्लोरोक्वीन

६ . कोरोनाव्हायरस

तसेच १ . शिवणकाम

२. शिलाई माशीन व त्याचे प्रकार

३. शिवणकाम आणि कपड्याची संबंधित

४. शिवणकामच्या माशीनचे विविध भाग आणि त्यावरील जोड.

५. मोजण्याचे आणि चिन्हांकित करणारी साधने आणि त्याचा वापर

६. कटींग साधने आणि वापर

७. सुई आणि धागे

८. विणकाम

९. शिवणकामची यंत्रणा तयार करणे

१०. शिलाई मशीन चालवणे

११. कपड्याची रचना, पद्धत

१२. टाके विविध प्रकारचे

१३. टिपांचे प्रकार

१४. वेगवेगळ्या प्रकारचे शिवण

१५. शिवण प्रकार

१६. भरतकाम

१७. धार पूर्ण

१८. शिलाई माशीनची स्वच्छता

१९. शिवण मशीन हाताळणे व निगा राखणे

२०. मशीन यंत्रणा हातळताना घ्यायची काळजी व उपाय    

लोकमान्य टिळकांचे खंडाचे स्कॅनिंग सुरु आहे. तसेच १, ४ व ६ ह्या खंडांचे

स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्यांची तपासणी सुरु आहे.

समग्र लोकमान्य टिळकांचे खंड  यांचे एकूण १२०० पाने स्कॅन करून झाले.

 तसेच http://www.indiagarbagecase.in/ या लिंक चे OCR केले. 

April – May 2020

कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये कोमल संभूदास हिने स्कॅनर घरी नेला होता . कोमल संभूदास हिने लोकमान्य टिळक

खंड यांच्या ८ खंडापैकी ३ खंड स्कॅन केले . म्हणजेच एकूण ४५६० पाने स्कॅन करून झाली.त्यानंतर मग सार्वजनिक खेड लायब्ररी चे २५ पुस्तके OCR करून झाले आहेत.

1.अनेक-कवी-कृत कविता

2.काव्यदोष विवेचन

3.केतकी ग्रहगणितम्

4.केरळ कोकीळ

5.कै. श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र

6.ज्योतिर्विलास

7.देशी हुन्नर

8.धर्मशास्त्र

9.न्याय रत्न

10.पवित्र शास्त्रातील इतिहास

11.प्रमाणशास्त्र

12.प्रसन्न राघव नाटक

13.प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन

14.बाळबोध मेवा

15.बाळमित्र भाग २

16. भारतीय ज्योतिशास्त्र

17.मराठ्यांच्या इतिहासाची साधनें

18.विधवाविवाह

19.शंकुछेद

20.श्री रामदासस्वामी कृत रामायण

21.श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण

22.श्रीमद भगवद एकादश स्कंद (हस्तलिखित)

23.संगीत शिवलीलामृत

24.सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास

25.हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति

तसेच विज्ञान आश्रम मधील कर्मचारी यांनी आणि डीआय सी फेलो यांनी सर्वांनी विज्ञान आश्रमात झालेल्या व होत असलेल्या ग्रामीण तंत्रज्ञान यावर वेगवेगळे २२ लेख तयार केले आहे.

मग आम्ही विज्ञान आश्रम मधील काही पुस्तके स्कॅन करून OCR केले.ती विकी कॉमन्स वर उपलब्ध केली. त्यामध्ये आम्ही श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांचे Dr. S. S. KALBAG पुस्तक तसेच आय बी टी या विभागातील शेती व पशुपालन, गृहआरोग्य,अभियांत्रिकी हि देखील पुस्तके स्कॅन केली.

सुबोध सर यांनी २९ मे रोजी डी. वाय पाटील आकुर्डी कॉलेज पुणे यास सोबत Virtually Video Conferencing द्वारे विकिपीडिया यावर कार्यशाळा घेतली. या मध्ये ३४ विद्याथ्यांचा सहभाग होता .

June 2020

जुन मध्ये आम्ही अक्वापॉनिक्स , ऊती संवर्धन ,पाणी पदभार,औष्णिक विघटन ,सौर औष्णिक ऊर्जा ,विश्व स्वाथ्य संस्था या विषयावर लेख लिहिले

दीक्षित आजी यांनी विकिबुक्स या प्रोजेक्ट मध्ये २३० नवीन अभंग लिहून ते उपलब्ध करून दिले आहे.

लेक लाडकी अभियान या मधील १३ पुस्तके OCR केली आहेत.आमची संस्कृती प्रश्नोउत्तरनामा,बालमित्र भाग १ या पुस्तकांचे Transclusion चे काम देखील पूर्ण झाले आहेत.तसेच रानडे डिक्शनरी भाग १ व भाग २ चे OCR चे काम पूर्ण झाले आहे.

तसेच जून महिन्यामध्ये रानडे डिक्शनरी यांच्या OCR च्या प्रोसेस नंतर आम्ही ती प्रूफरीड करायचं काम करत आहोत.

तसेच शेतकरी संघटनेची उरलेली काही पुस्तकांचे OCR करायचे काम पूर्ण केले आहे .

P.G.Sahstrabuddhe यांची १३ पुस्तके कोमल संभुदास हिने स्कॅन केली आहेत.

पाणी परीक्षण ,पंडुरोग ,पौधशाळा यावर लेख तयार केले आहेत

Advertisement
%d bloggers like this: